पिंपरी : निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला. त्यांनी कितीही टीका करू द्या, पण मी काम करण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आळंदीतील संवाद मेळाव्यात आढळराव बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, मनसेचे नेते बाबू वागस्कर, प्रकाश कुऱ्हाडे, किरण येळवंडे, राहुल चव्हाण, अजय तापकीर, योगेश रंधवे या वेळी उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी ज्यांना निवडून दिले, ते डॉ. कोल्हे अडीअडचणींना कधी धावून येत होते का? अडचणीच्या वेळेस धावून येणे, दोन गोड शब्द बोलणे एवढीच लोकांची अपेक्षा असते. तीसुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. विकास तर दूरच राहिला. पंधरा वर्षांत मी गावा-गावांमध्ये निधी पोहोचविला. मागील वेळी माझा पराभव झाला. परंतु, हार मानली नाही. उलट ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी लढत राहिलो. विविध योजना, प्रकल्प राबविण्याचा माझा मानस आहे. कोणाच्याही भावनेला बळी पडू नका, आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन, समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले आहे हे लक्षात ठेऊन मतदान करण्याचे आवाहन आढळराव-पाटील यांनी केले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
dhananjay munde sharad pawar supriya sule
धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांना टोमणा; म्हणाले, “एखाद्याच्या पोटचं असतं म्हणून झाली असेल चूक, पण…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
eknath shinde
“लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; नेमका रोख कुणाकडे?

हेही वाचा – पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल

हेही वाचा – पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा

मोहिते म्हणाले, की आळंदीकरांनी दरवेळी आढळरावांना मताधिक्य दिले आहे. त्यांना खासदार करण्यामागे आळंदीकरांचा मोठा हात आहे. या भागातून रेल्वे जाणार असल्यामुळे आळंदीचे महत्त्व वाढणार आहे. चाकण, आळंदीची महापालिका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आळंदीतील पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे आपण गेले पाहिजे.