लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मुंढव्यातील केशवनगर भागातील एका नागरिकावर टोळक्याने कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सोमवारी या भागातील नागरिकांनी बंद पाळला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्यााने टोळक्याने रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) यांचा रविवारी रात्री खून केला. या घटनेनंतर केशवनगर भागातील नागरिकांनी सोमवारी बंद पाळला. या भागातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. या भागात दहशत माजविणाऱ्या सराइत गुन्हेगारांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.