पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आराेपांबाबत त्यांनी येत्या २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश खेडकर यांना देण्यात आले आहेत.

प्रशिक्षणार्थी असताना खेडकर यांनी खासगी आलिशान मोटारीला अंबर दिवा लावला. मोटारीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन घेतले. खेडकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तक्रार केली. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठविला. खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपाबाबत लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश केंद्रशासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) दिले आहेत. याबाबत खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत त्यांनी समक्ष येऊन लेखी खुलासा करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – सेट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा… एसईबीसी आरक्षण होणार लागू

हेही वाचा – शिक्षण विभागाचे अधिकारी करणार शाळांची तपासणी… १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणार काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, खेडकर यांची प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत जिल्हाधिकारी दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला. खेडकर यांनी वाशीम पोलिसांकडे तक्रार दिली होती. हे प्रकरण पुण्यात घडल्याने वाशीम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे चौकशी सोपविली. खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. पुणे पोलिसांनी तीनदा समन्स बजावूनही खेडकर हजर झाल्या नाहीत.