पुणे : पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन व्हावे, याकरिता आलेल्या लाखो भक्तांना सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे दर्शन झाले. पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात, शरद पवार तरुणांना करणार मार्गदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण भारतातील कारागिरांनी २१ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.