पुणे : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने स्मार्ट सिटी पाण्यात गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून सोमवारी पाहणी दौरा करण्यात आला. त्याबाबतचा अहवालही संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे. शहराला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोपडून काढले. शहराच्या विविध भागात ५९ ठिकाणी पाणी साचण्याच्या, घर, इमारती आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या ३८ घटना नोंदविण्यात आल्या. तसेच झाडपडी आणि भिंत पडण्याच्या दहा घटनाही झाल्या. पावसाने शहराची दाणादाण उडविल्यानंतर महापालिकेवर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महापालिकेला जाग आली असून अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार, विलास कानडे यांनी शहराच्या काही भागाची पाहणी करून आढावा घेतला.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी तुंबण्याची कारणे कोणती, अतिक्रमण, नाले वळविणे, चेंबरचे काम तसेच मदतकार्य याचा अहवाल आयुक्तांना दिला जाणार आहे. त्यानुसार आज खेमनार यांनी आज हडपसर, कात्रज, कोंढवा भागाची पाहणी केली. तर कानडे यांनी कोथरूड, पाषाण, बावधन यांसह इतर भागात पाहणी केली आहे. शहरातील इतर ठिकाणांची पाहणी करून पुढील तीनचार दिवसांत याचा अहवाल दिला जाईल. तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.