पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची पदोन्नती मिळाल्यानंतर काही तासाच ती रद्द करण्यात आल्याने नाराज झालेल्या स्मिता झगडे प्रदीर्घ रजेवर गेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी झाली, तेव्हा त्यांच्या जागेवर उपायुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली होती. त्यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आल्याचे राज्य शासनाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले होते.

हेही वाचा >>> पुणे: केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

मात्र, अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्यांना मूळ पदावरच काम करण्याचे सुधारित आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. झगडे यांना पदोन्नती मिळाली होती, तेव्हाही पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रुजू करून घेतले नव्हते. राजकीय पातळीवर झगडे यांना विरोध आहे, हेच कारण तेव्हा सांगितले जात होते. पदोन्नती नाकारल्यापासून झगडे नाराज होत्या. याविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली आहे. काही दिवसांपूर्वी त्या रजेवर गेल्या आहेत. त्यांच्याकडील पदभार सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.