पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मंचर (ता. आंबेगाव) येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी भीमाशंकर येथे शरद पवार यांच्या अंगावरून साप गेल्याचे सांगितले.

खासदार सुळे म्हणाल्या, भीमाशंकरला आल्यानंतर डिंभे येथील विश्रामगृहात शरद पवार झोपले होते. झोपेत असताना त्यांच्या अंगावरून मोठा साप गेला होता. सापाने त्यांना काही केले नाही, तो अंगावरून निघून गेला. तो दिवस शुभ संकेत असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आठव्या दिवशी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून माझी आई आई प्रतिभा पवार श्रावण महिन्यात भीमाशंकरला येते, तिची श्रद्धा आहे. ज्या आई-वडिलांनी आपले बोट धरून चालायला शिकविले, त्यांना ज्या वयात गरज असते, त्यांना या वयात सोडणे चुकीचे आहे. यावर्षीपासून माझ्या आईला कधीच असे वाटू देणार नाही की भीमाशंकरला काही बदल झाला आहे. पण, तिच्या नियोजनात काही बदल होणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या मंत्री दिलीप वळसे पाटील यांना टोला लगाविला.

हेही वाचा…पक्ष ओरबाडून घेण्यात मजा नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला, ‘मलाही मंत्री’ …

बारामतीत पैसे वाटप, दमदाटी करण्यात आली. मध्यरात्री बँका उघड्या होत्या. यापूर्वी असले गलिच्छ राजकारण कधी झाले नव्हते. बारामती लोकसभा मतदारसंघाला कोणाची तरी दृष्ट लागली. धमक्यांना घाबरत नाही. हे ज्यांना घाबरत आहेत. त्यांच्यासमोर मी विरोधात भाषण करते, असेही त्या म्हणाल्या