१९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधनयुगाच्या भाष्यकार, स्त्रीसाहित्य-चळवळीच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. मीरा दामोदर कोसंबी (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले.
कोसंबी यांनी फग्र्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. १९ व्या शतकातील प्रबोधनपर्व या विषयावर प्रबंध सादर करीत श्रीमती कोसंबी यांनी पीएच. डी. संपादन केली. त्यानंतर २० वर्षे त्यांनी स्वीडनमध्ये अध्यापन कार्य केले. एसएनडीटी विद्यापीठातील स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या प्रमुख म्हणून कोसंबी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई यांचे इंग्रजी चरित्रलेखन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
डॉ. मीरा कोसंबी यांचे निधन
१९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधनयुगाच्या भाष्यकार, स्त्रीसाहित्य-चळवळीच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. मीरा दामोदर कोसंबी (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले.

First published on: 27-02-2015 at 04:31 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sociologist dr meera kosambi passes away