पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या सोहम कवडे हा विद्यार्थी आयसीडब्लूए फायनल परीक्षेत देशात दुसरा आला आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकांउंट्स ऑफ इंडियाकडून ‘कॉस्ट अँड वर्क अकाउंट्ससाठी परीक्षा घेतली जाते. दरवर्षी डिसेंबर आणि जून अशी दोन वेळा ही परीक्षा होते. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सोहम कवडे हा विद्यार्थी देशात दुसरा आला आहे. सोहम बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) सध्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेला सोहम शिक्षणासाठी पुण्यात राहतो. त्याचे वडील अनिल कवडे हे कोल्हापूर येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत.
‘कोणताही क्लास न लावता परीक्षेचा अभ्यास स्वत:च केला. इन्स्टिटय़ूटने दिलेल्या आराखडय़ानुसार अभ्यास केल्यास क्लास लावण्याची गरजच लागत नाही,’’ असे सोहमने सांगितले. सीए पेक्षाही ‘कॉस्ट अकांउटिंग’ या विषयात अधिक रस असल्यामुळे ही परीक्षा दिल्याचेही सोहम सांगतो.