scorecardresearch

पुणे : पुसाणे गाव होणार लोडशेडिंगमुक्त! दैनंदिन गरजांसाठी सोलर सिस्टीमद्वारे मिळणाऱ्या विजेचा होणार वापर

गावात तासनतास वीज नसायची. यामुळे गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागायचे. मात्र, आता सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळणार असल्याने शाळा, मंदिर, पाणी उपसाकेंद्र, पथदिवे हे सुरू राहणार आहेत.

solar system Pusane pune
(छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे – जिल्ह्यातील मावळ येथे असलेले पुसाणे हे गाव लोडशेडिंग मुक्त होणार आहे. पुसाणे गावात २४ तास सोलर सिस्टीमद्वारे गावाला वीज मिळणार असल्याने गावकरी आनंदी आहेत. गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात तासनतास वीज नसायची. यामुळे गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागायचे. मात्र, आता सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळणार असल्याने शाळा, मंदिर, पाणी उपसाकेंद्र, पथदिवे हे सुरू राहणार आहेत.

ग्रामीण भागात आजही तासनतास वीज नसते. याचा थेट फटका नागरिकांना आणि महिलांना बसतो. विजेविना पाण्याचा खोळंबा होतो, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. परंतु, पुसाणे येथील हाच प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार आहे. पुसाणे गावचे सरपंच संजय आवंडे आणि जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या पुढाकाराने सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात काम पूर्ण होईल, अशी माहिती गावचे सरपंच संजय आवंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा – पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाहन कर्ज सल्लागाराचाच बॅंकेवर डल्ला; ४७ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक

हेही वाचा – माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारेंविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर अत्याचार

परदेशातील एका खासगी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च करत सोलर प्रकल्प उभारला आहे. बॅटरी आणि जनरेटर बॅकअप असलेला हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुसाणे गावात गेली ३५ वर्षे बिनविरोध सरपंचाची निवड होत असून, गाव राजकारण विरहित असल्याने विकास होत आहे, अशी माहिती किशोर आवारे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 13:31 IST
ताज्या बातम्या