पुण्यातील समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर जैवविविधता उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित असलेल्या जमिनीवर सुरू असलेली नवीन बांधकामे थांबवावीत, अशी मागणी ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’ या मंचाने केली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे मंचातर्फे आपल्या मागण्यांचे पत्र देण्यात आले आहे.
बीडीपी क्षेत्रातील जुनी निवासी घरे पाडली जाणार नाहीत, या संकेताचा आधार घेऊन रातोरात बांधकामे केली जात असून ती जुनीच असल्याचे भासवण्यात येत असल्याचे मंचाने म्हटले आहे. वडगाव बुद्रुक आणि वारजे येथील टेकडय़ांवरील अनधिकृत बांधकामांची छायाचित्रे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली असून ही बांधकामे पडून दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही मंचातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2013 रोजी प्रकाशित
‘बीडीपी’वरील अनधिकृत बांधकामे रोखा- ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’ची मागणी
पुण्यातील समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर जैवविविधता उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित असलेल्या जमिनीवर सुरू असलेली नवीन बांधकामे थांबवावीत, अशी मागणी ‘सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह’ या मंचाने केली आहे.
First published on: 07-05-2013 at 01:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop unauthorised constructions on bdp save pune hills initiative