पिंपरी : जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महापालिकेतील सर्व दालने बंद आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेचे कामकाज ठप्प असून पालिकेत शुकशुकाट आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्‍त पदे भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने आज बुधवारीही बेमुदत संप सुरू आहे.

हेही वाचा – पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पकडले; बनावट पारपत्र जप्त; तरुणाची चौकशी सुरू

हेही वाचा – पुणे : जेजुरी गड पुनर्विकासासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. काम नाही, वेतन नाही हे धोरण अनुसरण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले. आजही कर्मचारी महापालिकेकडे फिरकले नाहीत. जे कर्मचारी आले होते, त्यांना घरी जायला सांगितले. अधिकारी आले तरी दालन उघडले जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना आल्या पाऊली परत फिरावे लागत आहे. आजही संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून महापालिका, क्षेत्रीय कार्यालये बंद आहेत. संपाचा नागरिकांना फटका बसत आहे.