पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. त्यामुळे नाटकाबाबत वाद होऊन कार्यकर्ते, कलाकार विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. हे प्रकरण पोलिसांत तक्रार दाखल करण्यापर्यंत गेले. मात्र या प्रकरणावरून समाजमाध्यमांत आता प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली असेल तर या कृत्याचा जाहीर निषेध, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली. रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष यांनी नाटक बंद पाडण्याच्या घटनेचा निषेध करून ललित कला केंद्राला पाठिंबा दिला.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

हेही वाचा…पुणे :ओला कचरा न जिरविणाऱ्या आस्थापनांची होणार तपासणी

तर दिग्दर्शक संगीतकार अजय नाईक यांनी या नाटकावरून टीका केली. आम्ही कॉलेज जीवनात अनेक सादरीकरणे केली. रामलीला नावाचे नाटक सादर करता आणि राम-सीता यांचे वस्त्र परिधान करून तोंडी शिवराळ संवाद? हे होतंय पुणे विद्यापीठात? कोण आहेत ही लोकं? कोण आहेत हे शिक्षक जे असले ‘ललित’ विद्यार्थी घडवत आहेत? ‘वैचारिक दारिद्र्य’ आणि ‘वैचारिक अधोगती’ आहे ही. मी धिक्कार करतो या विकृतीचा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.