‘पुणे शहराची एक वेगळी ओळख होती. मात्र, मागील पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने पुणेकर नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे’. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला. सुप्रिया सुळे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील हवेली तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी उरुळी देवाची येथील सावली हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा- करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘लाँग कोविड’ प्रमाणेच मानसिक अस्वास्थ्याचे प्रश्न गंभीर; लॅन्सेटच्या अहवालातील निष्कर्ष

भाजपाने ‘पुणे बदलतंय’ अशी टॅगलाईन केली होती. ती अगदी बरोबर ठरली. जागोजागी कचर्‍याचे ढीग, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे आपल्या दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची टॅगलाईन अगदी बरोबर आहे. नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं ते आपल्या लक्षात आले नाही. त्यामुळे नियोजनाच्या अभावामुळे पुणेकर नागरिकांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा- दिवाळीआधी पावसाची सुटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझी भारतीय जनता लाँड्रीला विनम्र विनंती आहे. आठ वर्ष केंद्रात, पाच वर्ष राज्यात आणि पुणे महापालिकेत सत्ता होती. आता राज्यात पुन्हा एकदा सरकार त्यांच आलं आहे. त्यामुळे काही झालं तरी राष्ट्रवादीवर आरोप करणे हे हास्यास्पद असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मला दुर्दैवी वाटत. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्याच्या कुटुंबामधील पत्नी किंवा इतर सदस्य निवडणूक लढू इच्छित असेल तर इतक्या टोकाची भूमिका कोणी घेत असल्यास ते योग्य नाही. ही आपली भारतीय संस्कृती नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.