बालकुमारांसाठी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यकार सुरेखा पाणंदीकर (वय ८०) यांचे नुकतेच दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्यामागे पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि ‘फिक्की’चे (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) माजी महासचिव डॉ. डी. एच. पाणंदीकर यांच्या त्या पत्नी होत.
सुरेखा पाणंदीकर या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व माजी केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या भगिनी होत. ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी संपादन केल्यानंतर पाणंदीकर यांनी बालकुमार साहित्य आणि ग्रंथालय चळवळीसाठी आपले आयुष्य वेचले. मुलांचे शिक्षण आणि सर्वागीण विकास या उद्दिष्टांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये पाणंदीकर यांनी काम केले. मुले आणि महिलांशी संबंधित वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक विषयांवर मराठी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केले. बालसहित्यामध्ये त्यांची ७० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. बालसाहित्यातील योगदानाबद्दल सुरेखा पाणंदीकर यांना अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
बालसाहित्यकार सुरेखा पाणंदीकर यांचे निधन
बालकुमारांसाठी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यकार सुरेखा पाणंदीकर

First published on: 01-11-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surekha panandiker died