किर्लोस्करांच्या नव्या पिढीचा विश्वास

भारतीय अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांच्या बळावर जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यात उत्तम तंत्रज्ञान सर्वाना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हे ध्येय ठेवून काम करू, जागतिक बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आहे. मात्र, स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी किलरेस्करांच्या रक्तातच आहे, असा विश्वास किलरेस्करांच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी आलोक आणि रमा किर्लोस्कर  यांनी व्यक्त केला.

‘किर्लोस्कर  ब्रदर्स लिमिटेड’ या कंपनीच्या कारकिर्दीच्या शंभराव्या वर्षांनिमित्त रविवारी पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात किर्लोस्कर  परिवाराच्या वतीने उद्योग समूहाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते किर्लोस्कर  ब्रदर्स लिमिटेडच्या ‘कोड ऑफ एथिक्स’ पुस्तकाचे आणि किर्लोस्कर  उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर  यांच्या ‘यांत्रिकाची यात्रा’ या आत्मचरित्राचे पुनप्र्रकाशन करण्यात आले. ‘किर्लोस्कर  ब्रदर्स लिमिटेड’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर  आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर या वेळी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले,की  नावीन्याचा ध्यास, सवरेत्कृष्ट दर्जा आणि जागतिक स्तरावर विस्तार पावताना विश्वासार्हता जपणे हे ‘किर्लोस्कर ’ या नावाचे वैशिष्टय़ आहे. देशांतर्गत संशोधन, आरेखन आणि निर्मितीबाबत आपण सध्या बोलत आहोत, मात्र ‘किर्लोस्कर  ब्रदर्स लिमिटेड’ स्थापनेपासून या तत्त्वांची अंमलबजावणी करत असल्याने जगभरात त्यांच्या कर्तृत्वाची ख्याती पोहोचली आहे.

संजय किर्लोस्कर  म्हणाले,की  शंभर वर्षांचा टप्पा गाठत असताना किर्लोस्कर  उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रचणाऱ्या लक्ष्मणराव आणि शंतनुराव किर्लोस्कर  तसेच त्यांना साथ देणाऱ्या अनेक गुणवंतांचे स्मरण होते. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासार्हता ही मूल्यं कंपनीच्या स्थापनेपासून नेहमीच प्राथमिक तत्त्वं राहिली आहेत, त्यामुळे त्यांची जपणूक करत काम करणे हे यापुढील वाटचालीत देखील कंपनीचे उद्दिष्ट राहणार आहे.

‘किर्लोस्कर  ब्रदर्स लिमिटेड’ चे शंभरावे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ‘कोड ऑफ एथिक्स’ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संजय किर्लोस्कर  तसेच रमा आणि आलोक किर्लोस्कर उपस्थित होते.