Pune Dahi Handi 2023 बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. गुरुवारी रात्री ८ वाजून ५५ मिनीटांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली. तर मच गया शोर… काठीन घोंगड घेऊ द्या… सुनो गौरसे दुनियावालो… जय श्रीराम… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवरही तरुणाईने ताल धरत गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव साजरा केला.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या  सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेला श्रीकृष्ण – कालियामर्दन असा भव्य ३० फूट उंचीचा एलईडी लाईट हलता देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Historical record of Ashram of Padmashri Shankar Baba Papalkar Polled with 60 children
६० मुलांसह बापाने केले मतदान; पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्‍या आश्रमाची ऐतिहासिक नोंद
Konda Vishweshwar Reddy
भाजपाचे विश्वेश्वर रेड्डी यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केली शेकडो कोटींची संपत्ती; एकूण आकडा…
12th April Panchang Rashi Bhavishya First Vinayak Chaturthi
१२ एप्रिल, विनायकी चतुर्थी: नववर्षात वृश्चिक, तूळसहित ‘या’ राशींना अचानक धनलाभाचे योग, १२ राशींचे भविष्य वाचा
madhuri dixit shares special video on the occasion of gudi padwa
“चंदनाच्या काठीवर शोभे…”, हिरव्या साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज