राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महिलांविषयीच्या विविध मुद्द्यांवर भाष्य करत महिला आयोगाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महिला आयोगाकडे महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारी येतात का? असं विचारलं असता, आम्ही महिलांबरोबरच पुरूषांच्याही तक्रारी घेतो, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – “महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या…”, फूटवेअर उत्पादन कंपनी तमिळनाडूत गेल्याने रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका
नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
“ज्या दिवशी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पहिली तक्रार एका पुरुषाची होती. ‘तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार हे समजताच मी खूप लांबून प्रवास करून आलो आहे. माझी तक्रार माझ्या पत्नीविरोधात आहे. पहिली तक्रार माझी घ्या’, असं त्या व्यक्तीनं मला सांगितलं. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने महिलांसाठी काम करत असलो, तरी आम्ही पुरुषांच्याही तक्रारी घेतो”, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra News Live : “कोण संजय राऊत?” म्हणणाऱ्या अजित पवारांना राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “एकाद्या पुरुषाची तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित कुटुंबाला बोलवून त्यांचे समुपदेशन करतो. दोघांनाही समजावून सांगतो. कारण कुटुंब संस्था ही आपल्या समाजाचा पाया आहे. त्यामुळे कुटुंब टिकवण्यावर आमचा भर असतो.”
हेही वाचा – Video : “कोण संजय राऊत?”, भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न; नेमकं काय घडलं वाचा
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “एकाद्या पुरुषाची तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित कुटुंबाला बोलवून त्यांचे समुपदेशन करतो. दोघांनाही समजावून सांगतो. कारण कुटुंब संस्था ही आपल्या समाजाचा पाया आहे. त्यामुळे कुटुंब टिकवण्यावर आमचा भर असतो.”, यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याच्या आरोपांवरही भाष्य केलं. “राज्य महिला आयोग पक्षपातीपणे काम करत नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या महिला लोकप्रतिनिधीवर खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे आयोग पक्षपातीपणे काम करतो, असं म्हणणं चुकीचं आहे”, असे त्या म्हणाल्या.