पुणे : गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक कामकाज झपाट्याने ऑनलाइन होऊनही ३१ टक्के शिक्षक अद्यापही डिजिटल साधने वापरण्यात सक्षम नाहीत. शिक्षणाचे कामकाज अचानक ऑनलाइन झाल्याने जवळपास ७९ टक्के शिक्षक सरावाने किंवा शिकून घेऊन त्याचा वापर करू लागल्याचे अहवालातून दिसून आले. टीमलीज एडटेकतर्फे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द टिचिंग कम्युनिटी हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला.

या अहवालासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशभरातील एक हजारपेक्षा शिक्षकांनी सहभाग घेता. गेल्या दोन वर्षांत ९० टक्के शिक्षकांनी  डिजिटल पद्धतीने शिकवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि अध्यापन कौशल्यांचा अंदाज घेऊन ती आत्मसात करून घेतली. तर या कौशल्यांमुळे करिअरसाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध झाल्याचे ६६.९४ टक्के शिक्षकांना वाटते. ७९.३४ टक्के शिक्षक त्यांच्या संस्थेकडून किंवा मूक्स अभ्यासक्रमांद्वारे प्रशिक्षण घेत आहेत. इंटरनेटचा वेग ही अडचण असल्याचे ६५.२९ टक्के शिक्षकांना वाटते, तर खास शिक्षकांसाठीचा लॅपटॉप आणि विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन उपलब्ध नसल्याचे ५०.४१ टक्के शिक्षकांनी नमूद केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

पारंपरिक अध्ययन-अध्यापन पद्धतींसह शिक्षणामध्ये डिजिटल साधनांचा वापर आता वाढत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना डिजिटल साधने वापरण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे, असे टीमलीजच्या सहसंस्थापक आणि अध्यक्ष नीती शर्मा  यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना रस कमी

ऑनलाइन वर्गांत बहुतांश विद्यार्थ्यांचा रस कमी होत असल्याचे ऑनलाइन पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी ७५ टक्के शिक्षकांना वाटते. तर डिजिटल पद्धतीने जोडले जाणे विद्यार्थी आणि शिक्षक अजूनही त्रासदायक होत असल्याचे ४४.६३ टक्के शिक्षकांना वाटते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.