पुणे : जगातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या Tesla (टेस्ला) कंपनीच्या भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. याचवेळी टेस्लाने देशातील पहिले कार्यालय पुण्यातील विमाननगरमध्ये भाडेतत्वावर घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे Tesla टेस्लाकडून गुंतवणुकीसाठी पुण्याची निवड होऊ शकते, असा कयास वर्तविला जात आहे.

टेस्लाची भारतातील उपकंपनी Tesla (टेस्ला) इंडिया मोटार अँड एनर्जीने विमाननगरमधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये ५ हजार ८५० चौरस फुटांचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले आहे. या कार्यालयाचे दरमहा मासिक भाडे ११.६५ लाख रुपये आहे. पहिल्या मजल्यावर हे कार्यालय असून, ते ३६ महिन्यांसाठी म्हणजेच ३ वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आले आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीजकडून हे कार्यालय भाड्याने घेण्यात आले असून, त्याचे भाडे दरवर्षी ५ टक्क्याने वाढणार आहे. या कार्यालयाचे भाडे १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. Tesla (टेस्ला) कंपनी मुंबईत कार्यालय सुरू करणार अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्याऐवजी कंपनीने आता पुण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

हेही वाचा >>>मणिपूर महिला अत्याचारप्रकरणी पुण्यात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा…!

टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भारतात प्रवेश करण्यासाठी कंपनी इच्छुक असून, त्यादृष्टीने कंपनीच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक मोटार उत्पादन निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा टेस्लाचा विचार आहे. सरकारने इलेक्ट्रिक मोटारींवरील आयात शुल्क कमी करावे, अशी मस्क यांची मागणी आहे. हा निर्णय झाल्यास टेस्लाच्या मोटारी भारतात आयात होऊन त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

हेही वाचा >>>लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावर चित्रपट करणे शिवधनुष्य पेलण्यासारखे – लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांची भावना

भारतात २०२१ मध्येच नोंदणी

टेस्लाची भारतातील उपकंपनी टेस्ला इंडियाने बंगळुरूमध्ये २०२१ च्या सुरूवातीला नोंदणी केली. कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी २०१९ मध्येच भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली होती. परंतु, त्यानंतर पुढे काही हालचाली झाल्या नव्हत्या.