पुणेकर वीरयोद्धा परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांचे नाव अंदमानातील एका बेटाला देण्यात आले आहे. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ त्यांना परम वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. देशातील २१ परम वीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी नुकताच घेतला असून त्या नामावलीत राणे यांचाही समावेश आहे.

हेही वाचा- पुणे : फेरफार नोंदी प्रलंबित ठेवल्याने पाच तलाठ्यांना नोटीस

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

राम राघोबा राणे हे वयाच्या २२ व्या वर्षी त्या काळी असलेल्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी गाजवलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची नियुक्ती बॉम्बे सॅपर्समध्ये करण्यात आली. त्यांना सेकंड लेफ्टनंट हे पद देण्यात आले. १९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात राजौरी, नौशेरा परिसरात त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव म्हणून त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १९५८ मध्ये ते मेजर म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ ते १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्तीवरील अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत राहिले. ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

हेही वाचा- ‘जी-२०’च्या जाहिराती करण्याचा ‘यूजीसी’चा फतवा; उच्च शिक्षण संस्थांच्या नियमित कार्यक्रमांवर ‘जी-२०’चे अतिक्रमण

अलिकडे म्हणजे ३१ जानेवारी २०२० रोजी बॉम्बे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात राणे यांच्या पत्नी राजेश्वरी राणे यांनी आपल्या पतीला मिळालेले परम वीर चक्र तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरात राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहिले तर अधिकारी आणि जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.