शहरातील आणि समाविष्ट गावांतील डाॅक्टरांचे प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली.शहर काँग्रेस आणि डाॅक्टर सेलच्या वतीने डाॅक्टरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात काही मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि डाॅक्टर सेलचे अध्यक्ष संभाजी करांडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या समवेत बैठक घेतली. त्यावेळी विक्रम कुमार यांनी ही ग्वाही दिली. माजी मंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. रवींद्रकुमार काटकर, सचिव डाॅ. अनिकेत गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब गरड, डॉ. भरत कदम, डॉ. ऋषिकेश नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक ; ऐनवेळी मंजूर कामांबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

नव्याने समाविष्ट २३ गावांतील नवीन रुग्णालयांच्या नोंदणीतील अडचणी, परवाना नूतनीकरण, नूतनीकरणावेळी आकारण्यात येणारे जास्त शुल्क, वैद्यकीय कचरा संकलनातील अडचणींना वैद्यकीय क्षेत्राला सामोरे जावे लागत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या अडचणींसंदर्भात संबंधित विविध विभागांतील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल आणि उपाययोजना करून या अडचणी सोडविल्या जातील, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.