मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांना विरोध केल्याने रिक्षाचालकावर चाकुने वार केल्याची घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून पसार झालेल्या चोरट्यांचा शाेध घेण्यात येत आहे.

हेही वाचा >>>Chhatrapati Shivaji Maharaj: …तर गाठ माझ्याशी आहे, संभाजीराजे छत्रपतींचा मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांना जाहीर इशारा

अक्षय चव्हाण (वय २८, रा. गांधीनगर, येरवडा) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. चव्हाण याने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण वाघोलीहून एका प्रवाशाला घेऊन बाणेरकडे निघाला होता. नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात चव्हाण सिग्नलला थांबला. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षाचालक चव्हाण याच्या खिशातील मोबाइल संच हिसकावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>पुणे : संशोधन समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास सहकार्य ; चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झटापटीत चव्हाणचा मोबाइल संच रिक्षात पडला. चव्हाण रिक्षातून खाली उतरला. चोरट्यांनी चव्हाणवर चाकुने हल्ला चढविला. चव्हाण याचे पोट आणि खांद्यावर चाकुने वार करुन चोरटे पसार झाले. चव्हाण याने चोरट्यांचे वर्णन पोलिसांना दिले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी शास्त्रीनगर चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.