पिंपरी-चिंचवडच्या देहूरोड मध्ये आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या बिलावरून ग्राहकाने दुकानदारास मारहाण केल्याची घटना घडली आहे.ही घटना रविवारी संध्याकाळी सात च्या सुमारास देहूरोडच्या राजपुरोहित स्वीट्स मध्ये रविवारी संध्यातकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. हा सगळा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसात अतुलच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[jwplayer q5zE0A23]

मिळालेल्या माहितीनुसार,सुरेशकुमार राजपुरोहित (वय-३५) रा.देहूरोड हे राजपुरोहित स्वीट्सचे मालक असून रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ग्राहक अतुलने आईस्क्रीम आणि चॉकलेट घेतले, मात्र याचे १२५ रुपये बिल देण्यास तो नकार देत होता.नेहमीच तो असे करायचा हे लक्षात आल्याने दुकानदाराने त्याला आधी पैसे देण्याची मागणी केली. त्यामुळं ग्राहकाचा राग अनावर झाला. त्याने दुकानदारास शिवीगाळ करून काउंटरच्या आत येऊन हाताने मारहाण करत,मिठाईची नासधूस देखील केली.एवढंच नाही तर बाहेर आल्यानंतर देखील दुकानदाराला धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी देहूरोड पोलीसात ग्राहक अतुल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.