देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने शनिवार आणि रविवारी राज्यात तापमानाचा पारा खाली गेला आहे. पुढील चार ते पाच दिवस हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना थंडीची प्रतीक्षा करण्यात गेल्यानंतर आता नव्या वर्षात नागरिकांना हिवाळा अनुभवण्यास मिळेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा >>>प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांचा देशभर ट्रॅक्टर मोर्चा

Where is the highest temperature in the Maharashtra state Pune print news
उष्म्याने केला कहर… राज्यात सर्वाधिक तापमान कुठे ?
Rising Temperatures in Maharashtra, Rising Temperatures in Maharashtra Lead to Increase in Heatstroke Patients, Heatstroke Patients in Maharashtra, Heatstroke Patients in Dhule, Heatstroke Patients in thane, Heatstroke Patients in wardha, thane, Dhule, wardha, Mumbai, Mumbai news,
धुळे, ठाणे, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण
Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…

गेले काही दिवस उत्तर भारतात थंडीची लाट मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, सिक्कीम ओरिसा, आसाम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी आणि दाट धुके पसरले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात थंडी आणि धुक्याची परिस्थिती कायम राहणार आहे, तसेच इतर राज्यांतही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>१३३९ गावांत अटल भूजल योजना; पाणीपातळी वाढविण्यासाठी निर्णय

काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम राजस्थानच्या वायव्येकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही पुढील किमान पाच दिवस थंडी पडेल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेकडे सरकल्यामुळे या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात किमान तापमान सरासरीच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.