पुण्याच्या मावळमध्ये आयोजित करण्यात आलेली कुस्तीची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. विषय कुस्तीचा नसून कुस्ती जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षीसाची ही चर्चा आहे. सहसा कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला बक्षीस म्हणून पैसै किंवा गाडी, गदा मिळते. मात्र, मावळमधील कुस्तीच्या स्पर्धेत जिंकणाऱ्या पैलवानाला यापैकी काही मिळाले नाही. तर कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला पैशांऐवजी म्हैस, बकरी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या आगळ्यावेगळ्या बक्षिसाची पंचक्रोशीत चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैस आणि बकरी दोन्ही शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणि दुभती जनावरे आहेत. त्यामुळे ही संकल्पना राबवली असल्याचे शेतकरी राजेश वाघोले यांनी सांगितले. कुस्तीत सुहास कदमला चितपट करून पैलवान नागेश राक्षेने डाव जिंकला. एवढचं नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पैलवानाला बक्षीसस्वरुपात बकरी देण्यात आली आहे.

५०० पैलवानांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता

मावळमधील दांरुब्रे या गावात काळभैरवनाथ आणि वाघजाई मातेच्या उत्सवानिमित्त कुस्तीचा आखाडा नुकताच पार पडला. या आखाड्यात बाजी मारणाऱ्या पैलवानाला बक्षीस म्हणून म्हैस आणि बकरी मिळणार होते. पैशांऐवजी शेतकऱ्यांसाठी आणि पैलवानाला उपयोगी पडतील, असे जनावरे त्यांनी बक्षीस म्हणून ठेवली. हे बक्षीस जिंकण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

आगळ्यावेगळ्या बक्षिसाची चर्चा

या ५०० पैलवानांपैकी अंतिम फेरीत पैलवान नागेश राक्षे आणि सुहास कदम यांच्यात लढत झाली. सुहासला चितपट करून नागेशने कुस्ती जिंकली. त्यामुळे नागेशला बक्षीस म्हणून म्हैस देण्यात आली. तर सुहास आणि इतरांना बकरी बक्षीस म्हणून देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या बक्षिसामुळे पुणे जिल्ह्यात मावळातील हा कुस्तीचा आखाडा गाजला आहे. शेतकरी राजेश वाघोले यांच्या संकल्पनेतून बक्षिसे देण्यात आली आहेत.   

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The winner wrestler was given a buffalo and goat as a prize in maval wrestling competition kjp
First published on: 11-05-2022 at 16:57 IST