देखाव्याच्या कळसाचा काही भाग काढताना एक कामगार तोल जाऊन खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. याचा धक्का दुसऱ्या एका कामगाराला लागल्याने आणखी एक जण जखमी झाला आहे. काल (रविवारी) मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विश्रामबाग पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मुख्य मंडपाच्या एका बाजूचा कळस काढताना हा प्रकार घडला. दगडूशेठ गणपतीच्या मुख्य उत्सव मंडपाच्या देखाव्यात तीन कळस आहेत. त्यातील दत्त मंदिराच्या बाजूकडील कळस विसर्जन मिरवणुकीत वापण्यासाठी काढण्याचे काम सुरु होते. काल पहाटेच्या सुमारास राम जाधव (वय २२) हा कामगार क्रेनच्या साहायाने कळस काढत होता. मात्र, काही समजण्याच्या आत हा कामगार मंडपाच्या बाजूच्या पत्र्यावर पडला. त्यानंतर कोलांटी घेत तो खाली रस्त्यावर पडला.

क्रेनच्या बास्केटचा धक्का लागल्याने तोल जाऊन हा कामगार खाली कोसळल्याचे सुत्रांकडून कळते. या कामगाराचा आणखी एकाला धक्का लागल्याने तो ही गंभीररित्या जखमी झाला आहे. मात्र, दुसऱ्या जखमीचे नाव कळू शकलेले नाही.  या घटनेनंतर दोघांनाही तत्काळ रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही अत्यवस्थ असल्याचे सुत्रांकडून कळते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The worker fell down from the cliff of dagdusheth halwai ganpati mandal
First published on: 03-09-2017 at 19:03 IST