लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सामिष पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या लष्कर भागातील जॉर्ज हॉटेलचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ९३ हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आणखी वाचा- होळी पौर्णिमेला भावकीच्या वादातून वेल्ह्यात तरुणाचा गोळ्या झाडून खून
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
याबाबत जॉर्ज हॉटेलचे मालक जवहार इस्माइल जवादी (वय ६२, रा. परमारनगर, वानवडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरात जॉर्ज हॉटेल आहे. चोरट्यांनी मध्यरात्री हॉटेलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी ९३ हजारांची रोकड आणि आठ मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.