लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गेल्या सात वर्षांचा विचार करता यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, यंदा मोसमी पाऊस विलंबाने येण्याची शक्यता गृहीत धरता पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे मोसमी पाऊस विलंबाने सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याचा आढावा घेतला. त्यात ही बाब समोर आली आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच शहराच्या पूर्व भागाला भामा आसखेड प्रकल्पातून काही प्रमाणात पाणी घेण्यात येते.

हेही वाचा… जिल्ह्यातील ४० हजार नागरिक तहानलेले; २४ गावांत २० टँकरने पाणीपुरवठा

यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण ९.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरणात ०.२४ टीएमसी (६.४६ टक्के), वरसगाव धरणात ५.८९ टीएमसी (४५.९५ टक्के), पानशेत धरणात २.६६ टीएमसी (२४.९६ टक्के) आणि खडकवासला धरणात १.१२ टीएमसी (५६.८२ टक्के) पाणीसाठा ८ मे रोजी आहे.

हेही वाचा… ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

दरम्यान, ८ मे रोजी सन २०१७ मध्ये चारही धरणांत मिळून केवळ ६.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सन २०१८ मध्ये ८.११ टीएमसी, सन २०१९ मध्ये ५.१७ टीएमसी, सन २०२० मध्ये १०.२५ टीएमसी, सन २०२१ मध्ये ११.२२ टीएमसी, तर गेल्या वर्षी ८ मे रोजी चारही धरणांत मिळून ९.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा गेल्या सात वर्षांचा विचार करता समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा… पुणे: पर्यटन महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी पाठ्यवृत्ती जाहीर

दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच ग्रामीण भागासाठी खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याच्या माध्यमातून दररोज १०५४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात पाच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले.