पुणे: नाताळ सणानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन सोमवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी सातनंतर आवश्यकता भासल्यास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

नाताळ सणानिमित्त शहर, परिसरातून नागरिक महात्मा गांधी रस्ता परिसरात गर्दी करतात. त्यामुळे आवश्यकता भासल्यास महात्मा गांधी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. सोमवारी सायंकाळी सातनंतर महात्मा गांधी रस्त्यावरील पंधरा ऑगस्ट चौकातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. कुरेशी मशिद, सुजाता मस्तानी चौकातून वाहतूक वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिर चौकातून अराेरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक तीन तोफा चौकातून वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून मोहंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटमार्गे स्व. इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार

हेही वाचा… निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या डोक्यात दगड घालणाऱ्याला अटक

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.