scorecardresearch

पहाटे फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटणारे चोरटे गजाआड

चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या हातावर कोयत्याने वार करुन मोबाइल संच हिसकावून नेला होता.

पहाटे फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटणारे चोरटे गजाआड
पहाटे फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटणारे चोरटे गजाआड

पुण्यात पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकाला धमकावून लुटणाऱ्या टोळीला चंदननगर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून मोबाइल संच आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा- ‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

नागरिकांवर वार करुन मोबाईलची चोरी

विनायक राजू अहिवळे (वय २१), वैभव शैलेश गायकवाड (वय २२, दोघे रा. मुंढवा), आदित्य नितीन बद्दम (वय २१, रा. साप्रस लाईन बाजार, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खराडीतील टस्कन सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर पहाटे फिरायला निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी धमकावून लुटले होते. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांना विरोध केला. तेव्हा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या हातावर कोयत्याने वार करुन मोबाइल संच हिसकावून नेला होता. या प्रकरणाचा चंदननगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

हेही वाचा- ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

नागरिकाला धमकावून मोबाइल हिसकावून नेणारे चोरटे खराडी भागातील जॅकवेलजवळ थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच अहिवळे, गायकवाड, बद्दम पळाले. पोलिसांनी पाठलाग करुन तिघांना पकडले. त्यांच्याकडून दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बापू भुजबळ, महेश नाणेकर, सूरज जाधव, श्रीकांत कोद्रे, शेखर शिंदे आदींनी ही कारवाई केली. आरोपींनी पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना धमकावून आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या