पिंपरी- चिंचवड: देहूरोड येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल धरपकड झाली. ही घटना मध्यरात्री दोन च्या सुमारास घडली आहे. मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही सख्या भावांची नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन च्या सुमारास देहूरोड येथे गॅस कटर ने एटीएम फोडण्याचा प्रयत्न खान टोळीचा होता. दोघांसह एकूण पाच जण एटीएम फोडण्याचा तयारीत होते. गस कटरने एटीएम फोडणार तेवढ्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. इतर तीन चारचाकी गाडीतून फरार झाले आहेत. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल मारामारी झाली.
आरडाओरडा येकून नागरिक घराबाहेर आले. नागरिकांनी ही पोलिसांना मदत केली, आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे हरियाणा येथील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
देहूरोड मध्ये गेल्या महिन्यात एटीएम फोडून १६ लाख रोख रक्कम पसार केली होती. आता त्याच शेजारी असणारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांच्या धाडसामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.