scorecardresearch

Premium

पुणे : सासरवाडीत जावयाची हत्या; तीन ते चारजणांनी धारदार शस्त्राने केले वार!

पुण्याच्या मावळमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. मावळमधील गहुंजे येथे अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

murder of man gahunje
पुणे : सासरवाडीत जावयाची हत्या; तीन ते चारजणांनी धारदार शस्त्राने केले वार! (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : पुण्याच्या मावळमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. मावळमधील गहुंजे येथे अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुरज काळभोर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो सारसरवाडीत जेवनानिमित्त आला होता. जेवण झाल्यानंतर सुरज आणि त्याची पत्नी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते, तिथं तीन ते चारजणांनी सुरजची निर्घृण हत्या केली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज काळभोर याचा दीड ते दोन महिन्यापूर्वी गहुंजे येथील मुलीसोबत विवाह झाला होता. सर्व काही सुरळीत चाललं होतं. सुखी संसार सुरू होता. रविवारी सुरज गहुंजे येथे सासरवाडीत जेवणाकरिता आला होता. जेवण करून तो पत्नीसह शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला. तिथं अज्ञात तीन ते चारजणांनी धारदार शस्त्रांनी वार करून सुरजची निर्घृण हत्या केली.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा – पुणे : चिकू, पेरू, डाळिंब झाले महाग

सुरजसोबत पत्नी होती. पत्नीने ही घटना पाहिली आहे का? याबाबतचा तपासदेखील पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. हत्या करणारे मारेकरी कोण आहेत? नेमकी हत्या कोणत्या उद्देशाने केली हे शोधणं पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सुरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×