पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लॅावरच्या दरात घट झाली. कोबी आणि तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली आहे. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती पुण्यात भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

परराज्यातून भाज्यांची आवाक

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१९ जून) राज्य तसेच परराज्यातून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, इंदूरहून ३ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, गुजरात तसेच तळेगाव, नाशिक भागातून मिळून ४० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांची आवाक
पुणे विभागातून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो साडेसाठ ते नऊ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, कांदा ५५ ते ६० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्यांच्या दरात वाढ
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दीड लाख कोथिंबीर जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चाकवत, करडई, चुक्याच्या दरात वाढ झाली आहे. चवळईच्या दरात घट झाली असून शेपू, पुदीना, अंबाडी, मुळा, पालक, राजगिऱ्याचे दर स्थिर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरबूज, चिकूच्या दरात वाढ
घाऊक फळबाजारात खरबूज आणि चिकूच्या दरात वाढ झाली. सीताफळाच्या दरात घट झाल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. कलिंगड, पपई, अननस, पेरु, संत्री, मोसंबी, डाळिंब, लिंबांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ५ ट्रक अननस, डाळिंब ३५ ते ४० टन, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ ते दीड टन, कलिंगड ४ ते ५ ट्रक, खरबूज २ ते ३ टेम्पो, लिंबे एक हजार ते बाराशे गोणी, पपई १० ते १२ टेम्पो, पेरू २०० ते २५० क्रेट्स (प्लास्टिक जाळी), सीताफळ दीड ते दोन टन अशी आवक