लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असताना बाजारात नेण्यासाठी म्हणून शेतकऱ्याने वाहनात ठेवलेल्या २० क्रेट टोमॅटो सकाळी उठून पाहतो तर चोरीला गेल्याची घटना शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथे घडली. सध्याच्या बाजारभावानुसार या शेतकऱ्याचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Anger due to rainwater entering the house Former corporator beten in Nagpur
पावसाचे पाणी घरात शिरल्याने संताप, नागपुरात माजी नगरसेवकाला चोप
attack on mumbai police, Funeral Dispute, mumbai police, attack on mumbai police in Mulund, Six Arrested,
मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, मुलुंडमधील घटना
Alandi, boy, car, Pimpri,
पिंपरी : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची आळंदीत पुनरावृत्ती; अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार अंगावर घातल्याने महिला जखमी
local train passenger, thane railway station, platform no five and six, rain, central railway
रुंंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे, लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत
speeding truck crushed young man putting up posters one dead
वर्धा : भरधाव ट्रकने पोस्टर लावणाऱ्या युवकांना चिरडले; एक ठार, दोन गंभीर
Three victims of recklessness Two-wheelers collide head-on
पुणे : बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
son-in-law, kidnap, marriage,
लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण
Kolhapur three drowned
कोल्हापूर: राधानगरी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू

अरुण बाळू ढोमे असे टोमॅटो चोरी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ढोमे यांनी विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे २० क्रेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा-प्रवाशांसाठी खूषखबर! रेल्वे स्थानकावर आता स्वस्तात पोटभर खा

ढोमे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. टोमॅटो पिकाची तोडणी करून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योग्य निवड करून टोमॅटो क्रेट आपल्या वाहनातून घराजवळ आणून उभे केले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गाडी आणि क्रेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून मी झोपी गेलो. मात्र, सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले क्रेट गाडीमध्ये नव्हते. टोमॅटोची क्रेटसह चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्याद दाखल केली असून या घटनेचा कसून तपास करण्याची विनंती केली आहे.