सर्वात मोठा अध्यात्मिक सोहळा ‘सिंहस्थ २०१६’ साठी मध्यप्रदेश टुरिझम सज्ज झाले आहे. दिनांक २२ एप्रिल ते २१ मे दरम्यान हा सोहळा भरविण्यात येणार आहे. मध्यप्रदेश टुरिझम यंदाचे वर्ष ‘मध्यप्रदेश टुरिझम वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे.
सिंहस्थासाठी चार हजार हेक्टर जागा अधिग्रहित करण्यात आली असून धार्मिक आणि सामाजिक-आर्थिक उपक्रमांसाठी एक शहर म्हणून ती विकसित करण्यात येत आहे. हा सोहळा दोन महिने चालणार आहे. पवित्र स्नानांसाठी ७.२५ किलोमीटर लांबीच्या घाटाचे नूतनीकरण व बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती मध्यप्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक तन्वी सुंद्रियाल यांनी दिली.
मध्यप्रदेशातील ठिकाणांना भेटी देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी काही खास विकएंड पॅकेजेस तयार केली आहेत. त्यामध्ये रोमँटिक मांडू, जंगल टायगर टेल यांचा समावेश आहे. त्याचा लाभ पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वीणा रामण यांनी केले.