पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात एका ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सहकारी क्लिनरने केलेल्या चाकू हल्ल्यात ट्रक रोशन शर्मा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी खिलेश्वर कुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रोशन वर्मा (वय २७ रा.डोंबिवली) आणि क्लीनर खिलेश्वर कुमार यादव ( रा.बिहार) हे एकाच माल वाहतूक ट्रकवर कामाला होते. क्लीनर खिलेश्वरला नेहमी चालकापासून धोका असल्याचे भासत होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. सकाळी डोंबिवली येथून भोसरीमध्ये पत्रे पोहचवण्यासाठी हे दोघे ट्रक घेऊन आले होते. मात्र, निगडीतील अंकुश चौकात आल्यानंतर अचानकपणे खिलेश्वरने चालकाच्या पोटात चाकूने वार केले यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck cleaner knife attack on driver in pimpari chinchwad
First published on: 17-11-2017 at 15:14 IST