रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : नायलॉन मांजावर घातलेले बंदीचे आदेश धुडकावून संक्रातीला पतंगबाजी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. रविवारी दुचाकीस्वार पवार आणि गवळी पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. त्यांच्याबरोबर असलेले सहकारी गवळी यांचा हात मांजामुळे चिरला, अशी माहिती हेल्प रायडर्स संस्थेचे स्वयंसेवक, पक्षीमित्र  बाळासाहेब ढमाले यांनी दिली.

हेही वाचा >>> पुण्यात कोयता गँगविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; हडपसरमधील सराईत गुन्हेगाराला साताऱ्यात पकडले

ढमाले हे शंकर महाराज उड्डाणपुलावरुन दुचाकीवरुन निघाले होते. त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी पोलीस कर्मचारी पवार आणि गवळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मांजामुळे पक्षी जखमी संक्रातीला पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर करण्यात आल्यने शहराच्या वेगवेगळ्या भागात घार, कावळा, कबुतर, पारवा या पक्ष्यांना दुखापत झाली. पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले यांनी रविवारी (१५ जानेवारी) कोथरुडमधील सर्वत्र सोसायटी, बुधवार पेठ तसेच कसबा पेठेत मांजात अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. मांजामुळे घारींच्या पंखांना दुखापत झाली. ढमाले यांनी घारींची सुटका करुन कात्रज येथील प्राणी, पक्ष्यांच्या अनाथालयात उपचारासाठी दाखल केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two policemen injured by kite string on pune satara road pune print news rbk 25 zws
First published on: 16-01-2023 at 15:17 IST