पिंपरी : बारामतीमध्ये पवार कुटुबियांबरोबरच महायुतीमध्ये मोठे राजकीय घमासान सुरु असून माजी राज्यमंत्री, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवतारे खरोखरच बंडखोरी करणार का याबाबत राज्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे.

चिंचवड दौऱ्यावर असेलेले शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की, बारामतीत बंडखोरीच्या तयारीत असलेल्या विजय शिवतारे यांची भूमिका मला झेपणारी नाही. पेलवणारी नाही. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज बैठक आहे. त्यात मार्ग निघेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमका काय मार्ग निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

हेही वाचा…मावळ लोकसभा: श्रीरंग बारणे हेच खासदार होतील- उदय सामंत

शिवसेनेने जागा वाटपाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असे सांगतानाच खासदार बारणे यांचा सहकारी म्हणून माझे मन सांगतेय की मावळमधून बारणे हेच दीड महिन्यांनी खासदार म्हणून लोकसभेत दिसतील असा दावा केला. सामंत यांच्या या विधानामुळे मावळची जागा शिवसेनेकडेच कायम राहण्याची आणि बारणे यांना तिस-यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…अजित पवारांचे आज बारामतीत शक्तिप्रदर्शन, सात सभांचे आयोजन

पवना, इंद्रायणी नदी सुधारच्या कामाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नद्या स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची मागणी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नदी स्वच्छतेचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असेही सामंत म्हणाले.