पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या (रानडे इन्स्टिटय़ूट) प्रमुख पदावरून डॉ. उज्ज्वला बर्वे यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांचा प्रभारी कार्यभार विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडीजच्या विभागप्रमुखांकडे सोपवण्यात आला आहे.
रानडे इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या गुणांमध्ये अनियमितता आढळल्याची तक्रार विद्यापीठाकडे आली होती. त्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. यशवंत सुमंत यांच्या समितीने विद्यार्थ्यांचे गुण बदलण्यात आल्याचा अहवाल दिला होता. त्या अहवालाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. बर्वे यांना विभाग प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले असल्याचे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. डॉ. बर्वे यांची विभागीय चौकशी होणार असून, त्या समितीसमोर त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी पूर्णपणे देण्यात येईल, असेही डॉ. गाडे यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujjwala barve dismissed on head of communication and journalism department
First published on: 15-08-2013 at 02:42 IST