देहुरोड परिसरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन समाजकंटकांनी काही महिलांना मारहाण करत सहा गाड्यांची तो़डफोड केली होती. ही घटना ताजी असतानाच देहुरोड परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांनी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने तोडफोड केली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. परंतू या घटनेविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोडफोड करण्यात आलेली चारचाकी वाहनं रवी खन्ना व जावेद शेख या व्यक्तींच्या मालकीची आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी रवी खन्ना यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, त्यावेळी ते आपल्या गाडीच हजर असल्याची माहिती मिळते आहे, मात्र सुदैवाने या घटनेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी ही तोडफोड केल्याचं समजतं आहे, मात्र सीसीटीव्हीत या मारेकऱ्यांचे चेहरे कपड्याने झाकल्याचं दिसत असल्यामुळे त्यांची नेमकी ओळख समजू शकलेली नाहीये. दरम्यान या घटनेबद्दल अजुनही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unidentified persons vandalize two cars in dehu road area incident caught in cctv
First published on: 13-05-2018 at 15:27 IST