पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाल्यानंतर आता विद्यापीठाच्या बोधचिन्हातही बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सर्व कागदपत्रांवर नवे बोधचिन्हच वापरण्यात यावे, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ अशी नवी ओळख विद्यापीठाला देण्यात आली. सप्टेंबर २०१४ मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाच्या सुधारित नावाचाच वापर करण्याबाबत सूचना विद्यापीठाने दिल्या होत्या. आता दीड वर्षांनंतर विद्यापीठाच्या बोधचिन्हातही बदल करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे हे मूळ बोधचिन्ह १९५० रोजी तयार करण्यात आले. माधव परशुराम दीक्षित यांनी हे बोधचिन्ह तयार केले होते. कमळाच्या आकारात शनिवारवाडा, त्याखाली दोन घोडय़ांनी धरलेला फलक, त्यावरील पुस्तकावर विद्यापीठाचे नाव. त्याखाली दोन तलवारी. त्यामध्ये इंग्रजीत लिहिलेले नाव, बाजूला गजमुख, कमळाच्या दोन कोपऱ्यात एका बाजूला रायगड आणि दुसऱ्या बाजूला पर्वती. या बोधचिन्हामधील विद्यापीठाचे नावही आता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ करण्यात आले आहे. सर्व विभागांनी यापुढे नवे बोधचिन्हच वापरावे अशी सूचनाही विद्यापीठाने केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2016 रोजी प्रकाशित
विद्यापीठाच्या बोधचिन्हातही आता विस्तारित नाव
पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाल्यानंतर आता विद्यापीठाच्या बोधचिन्हातही बदल करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-01-2016 at 03:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University emblem change