पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक’ या नविन कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला असतानाच आता पिंपरीतही या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदू जात पंचायतीने समाजातील सहा कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैदू समाजाचे रामभाऊ लोखंडे आणि त्यांच्या सहा भावांना समाजातुन बहिष्कृत करण्यात आले होते. २०१४ मध्ये समाजातील लोकांनी लोखंडे कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला होता. ५० हजार रुपये रक्कम घेऊन लोखंडे यांना समाजात घेण्यात आले. मात्र १६ जुलैला पुन्हा वैदू समाजाची पंचायत बसली. रामभाऊ लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याला विरोध केल्याने त्यांना बहिष्कृत करण्यात आले. शेवटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगवी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaidu jat panchayat social boycott on lokhande family in pimpri police registered case
First published on: 18-07-2017 at 19:52 IST