Nilesh Chavan Arrested from Nepal in Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.