पिंपरी चिंचवड: वैष्णवी हगवणेला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर अपेक्षाभंग होईल आणि गृहमंत्रालय हे कमकुवत आहे, असा समज होईल. असं परखड मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल आहे. तसेच महाराष्ट्रातील हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कस्पटे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केलं, घटनेची माहिती घेतली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, महिला आयोगाने योग्य रित्या तक्रारीच निवारण करायला हवं. कठोर कारवाई व्हायला हवी. महिला आयोग आता सुधारायला हवं. सत्ताधारी पक्षाच्या महिला आयोग अध्यक्ष आहेत. तात्काळ महिला आयोगाने ऍक्शन घ्यायला हवी. पुढे ते म्हणाले, वैष्णवीला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. तपास अधिकाऱ्यांनी कस्पटे यांना वेळोवेळी माहिती द्यावी. तपास सीआयडीने सुद्धा करावा.
कुटुंबाला अंधारात ठेऊन तपास होऊ नये. पुढे ते म्हणाले, घटनेचा निषेध करतो. ही क्रूर घटना आहे. कस्पटे कुटुंबासोबत आम्ही आहोत. वैष्णवीची सामूहिक हत्या करण्यात आली आहे, ही आत्महत्या नाही. वैष्णवीच्या अंगावर व्रण आहेत. षडयंत्र रचून वैष्णवीला मारल आहे. १२० (ब) कलम लावल पाहिजे. सरकारी वकील लवकरात लवकर नेमण्यात यावा. मोक्का लावतो म्हटले त्याची प्रक्रिया सुरू आहे का? सत्तेतील आरोपी असल्याने हे प्रकरण दाबले अस वाटायला नको. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर अपेक्षा भंग होतील. गृहमंत्रालय हे कमकुवत आहे असा समज होईल. असही मनोज जरांगे पाटील म्हणाले.