Valentine’s Day 2020 : केवळ तिच्या उपचारांसाठी तीन वर्षांपासून करतोय तो नाईट ड्युटी

जोडीदाराची साथ कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, असा संदेशही दिला आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ सोडणार नाही. अशा प्रेमभावना तिच्या हाती गुलाब देऊन व्यक्त करणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस खास आहे, कारण आज ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी अशाप्रकारे आपल्या प्रेमभावना व्यक्त करणारे आपल्याला दिसतात . मात्र, फार क्वचित जण एकमेकांना दिलेलं वचन पाळताना दिसतात. मात्र, एकमेकांनी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहण्याची दिलेलं वचन खऱ्या अर्थाने सत्यात उतरवणाऱ्या त्या दोघांशी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्त लोकसत्ता ऑनलाईनने संवाद साधला आहे.

खरंतर ते दोघे आजच्या काळातील तरुणाईसमोर आदर्शवत जोडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे, ती जोडी चित्रपटसृष्टी किंवा राजकीय क्षेत्रातील नसुन तुमच्या आमच्या सारखी सर्वसामान्य कुटुंबांतील आहे. समीर आणि रूपाली कुलकर्णी हे ते दाम्पत्यं आहे. तीन वर्षांपुर्वी रूपाली कुलकर्णी या चौथ्या मजल्यावरून पडल्या होत्या, त्यांच्या उपचारासाठी त्यांचे पती समीर हे तेव्हापासून आजपर्यंत नाईट ड्युटी करून त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. या खास जोडीबद्दल आज व्हॅलेंटाइन डे निमित्त त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर आपण नजर टाकणार आहोत.

पुण्यातील कात्रज भागात एका सोसायटीमध्ये समीर आणि रूपाली कुलकर्णी हे दाम्पत्य मागील काही वर्षांपासुन राहत आहे. त्यांच्या लग्नाला आता दहा वर्ष झाली असुन त्यांना आठ वर्षाचा शौर्य हा मुलगा आहे. ते दोघेही उच्चशिक्षित असुन समीर एका नामांकित कंपनीत कामाला आहे. तर रूपाली यांना पेंटिंगची आवड आहे. समीर आणि रूपाली या दोघांच्या आयुष्यात २०१६ सर्व ठीक सुरू होतं. शौर्य पाच वर्षांचा असताना, त्याला खेळण्यासाठी रूपाली या इमारतीच्या टेरेसवर त्याला घेऊन गेल्या होत्या. शौर्य खेळत असल्याचे पाहून, त्या इमारतीच्या कठड्यावर बसल्या होत्या. मात्र, त्याच क्षणी रूपाली यांचा अचानक तोल गेला, काही समजण्याच्या आतमध्ये त्यांनी कठड्याला पकडले व शौर्यला मामाला आवाज दे असं म्हणू लागल्या मात्र तो लहान असल्याने त्याला काही लक्षात आले नाही. तो देखील त्यांच्याकडे पाहत राहिला. साधारण मिनिटभर रुपाली कठड्याला धरून राहिल्या अखेर त्यांचा तोल सुटून त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्या. त्यानंतर घरातील मंडळीनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. तीन दिवसानंतर त्या शुद्धीवर आल्या होत्या. मात्र, त्यांच्या शरीरात नऊ ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं. तीन दिवसात डॉक्टरांनी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या. तरी त्यांना वाचवण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टर म्हणाले होते.

ही सर्व परिस्थिती पाहून पती समीर डगमगले नाही, त्यांनी हार मानली नाही. काही झाले तरी पत्नीला वाचावा कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर आजपर्यंत रूपाली यांच्यावर दहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ज्यावेळी ही घटना घडली आणि काही दिवसानंतर रूपाली यांना घरी आणण्यात आले. तेव्हा रोजचं जेवण, वेळेवर औषध अशी सर्व काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला. हे पाहून समीर यांनी कंपनीमधील व्यवस्थापक सोबत चर्चा करून नाईट ड्युटी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१६ पासून ते आजपर्यंत नाईट ड्युटी करून समीर हे रूपाली यांची सर्वप्रकारे काळजी घेत आहेत.

आता रूपाली वॉकरच्या सहाय्याने थोडफार चालत आहेत, पण अद्यापही इतरांसारख त्या चालू शकत नाहीत. लवकरच त्यांच्यावर अजून शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांनी स्वतःमधली पेंटिंगची कला आजही जपली आहे. त्यांनी घरी बसून पेंटिंग करण्याचे काम पुन्हा सुरू केलं. एढच नाहीतर त्यांच्या पेंटिंगची विक्री देखील झाली आहे.

मागील तीन वर्षांपासून समीर कुलकर्णी यांनी पत्नीच्या उपचारासाठी नाईट ड्युटी करून, खऱ्या अर्थाने रात्रीचा दिवस करणे, काय असते. आपल्या जोडीदाराला दिलेला शब्द, त्याच्या किंवा तिच्या बद्दल असलेलं अतुट प्रेम अखेरच्या क्षणापर्यंत कशा प्रकार घेऊन जायचं असतं. हे जगाला दाखवून देण्याचं काम केल आहे.

जोडीदाराची साथ कधीही सोडू नका –
आम्ही दोघं मागील तीन वर्षांत कठीण काळातून गेलो आहोत. मात्र, आम्ही दोघांनीही कधी हार मानली नाही. येणार्‍या प्रसंगाला सामोरे जायचं एवढच ठरवल आहे आणि आम्ही पुढे जात आहोत. सुरुवातीला अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आजच्या पिढीने किती कठीण प्रसंग आला, तरी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, आयुष्यात आपल्या जोडीदाराची साथ कधीच सोडू नका, असं आवाहन समीर आणि रूपाली कुलकर्णी यांनी आजच्या व्हॅलेंनटाईन डे च्या निमित्त तरुणाईला केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Valentines day 2020 night duty he doing from three years for her treatment msr 87 svk

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या