राज्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसह स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरणाची हानी, व्यसनांचे वाढते प्रमाण, पाण्याचा अपव्यय अशा प्रश्नांबाबत प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. ‘घेऊन सप्रेम जय हरी, पंढरीचा वारकरी’ या उपक्रमांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘साधून संवाद बळीराजाचा, करू विचार दूर आत्महत्येचा’, ‘मुला-मुलींचा विवाह काटकसरीने करा’, ‘स्त्रीभ्रूणहत्या करू नका, भविष्यातील आईला मारु नका’, ‘बल बुध्दी वेचूनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती’, ‘प्रत्येकाने एका तरी वृक्षाची लागवड करा’, ‘नका करु ग्रामस्वच्छता, नाहीच होणार घाण याची घ्या दक्षता’, ‘जो दारु गुटख्याचे व्यसन करी, त्याच्या श्रमाची लक्ष्मी जाईल नराधमाच्या घरी’ ही सप्तसूत्री परिषदेने तयार केली असून ती घरोघरी नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरावर परिषदेचे प्रतिनिधी पाहणी करून पुरस्कारांपात्र गावांची सूची तयार करणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या आदर्श गावांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, खजिनदार अभय टिळक, कार्याध्यक्ष तनपुरे महाराज यांचे मार्गदर्शन लाभले असून परिषदेतर्फे २३ एप्रिल रोजी आळंदी येथे होणाऱ्या बैठकीमध्ये या सप्तसूत्रीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varkari sahitya parishad awareness campaign over different social issues
First published on: 16-04-2017 at 00:01 IST