महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. असं असताना ते वसंत मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं पुण्यातील निवासस्थान राजमहाल याठिकाणी ही भेट झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant you organize misal mahotsav i will come raj thackeray advice to mns leader vasant more after being absent for maha aarti pune rmm
First published on: 08-05-2022 at 14:31 IST