पुणे : ‘मुलाने मोटार चालवायला मागितली, तर चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस’, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांनी दिली होती, अशी माहिती अगरवाल याच्याकडे काम करणाऱ्या मोटारचालकाने पोलिसांना दिली आहे. तसेच तांत्रिक बिघाड असतानाही अगरवाल याने मुलाच्या ताब्यात मोटार दिल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि त्याची मैत्रीण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.त्यानंतर मोटारचालक अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलाला मद्या उपलब्ध करून देणे, तसेच त्याला मोटार दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली. मुलाने ज्या पबमध्ये मद्या प्राशन केले होते. त्या पबमधील कर्मचारी शेवानी आणि गावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

vasant more facebook post
पुणे अपघातातील राजकीय वादात वसंत मोरेंची एन्ट्री; स्थानिक पुढाऱ्यांना इशारा देत म्हणाले, “हिंसक आंदोलन झालं तर…”
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

हेही वाचा >>>Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवता येईल का?

पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या मोटारीच्या चालकाचा जबाब नोंदवला आहे. मुलाने जर गाडी चालवायला मागितली, तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, अशी सूचना अगरवाल याने दिली होती. अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल आणि पबमध्ये मद्या मिळते, याची माहिती अगरवाल याला होती. त्याने मुलाला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे (पॉकेटमनी) दिले होते का, पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा क्रेडिट कार्ड दिले होते काय, अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीसाठी आणखी कोण कोण होते, याबाबत आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

तांत्रिक बिघाड असतानाही मोटार मुलाच्या ताब्यात

या प्रकरणातील परदेशी बनावटीची महागडी मोटार बंगळुरूतून खरेदी करण्यात आली होती. मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अगरवाल यांच्या निदर्शनास आले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अगरवाल याने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार प्रलंबित आहे. त्यामुळे मोटारीची नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. बचाव पक्षाच्या युक्तिवादावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. मोटारीत तांत्रिक बिघाड होता, तर मोटार मुलाला चालविण्यासाठी का दिली, असा प्रश्न सरकारी वकील विद्या विभूते यांनी उपस्थित केला.

अगरवाल याच्यावर शाईफेक

अगरवाल याला बुधवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या वेळी वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर शाईफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अगरवाल याला न्यायालयात नेले.

अगरवालकडून पोलिसांची दिशाभूल

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी विशाल अगरवाल याच्याशी संपर्क साधला. ते पुण्यात होते. मात्र, मी शिर्डीत आलो आहे, अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली, असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले. अगरवाल याला मंगळवारी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. अटकेनंतर त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे साधा मोबाइल संच सापडला. या मोबाइलमधील सिमकार्ड १९ मे रोजी वापरात आल्याचे आढळून आले आहे. अगरवालने त्याचा मूळ मोबाइल संच लपवून ठेवला आहे. त्या मोबाइल संचात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकतात, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.