जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी १६७ जागांवर ५१९ उमेदवार, तर १०६२ सदस्यपदांसाठी ३०१३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा >>>पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अक्षेपार्ह टिप्पणीबद्दल गुन्हा

जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. २२१ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतींमधील सदस्य बिनविरोध झाले आहेत. तसेच या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट केली जात असून ४५ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता सरपंचपदाच्या १६७ जागांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा >>>VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने दिलेल्या माहितीनुसार सदस्य पदांच्या १०६२ जागांसाठी मतदान होत असून त्यासाठी ३०१३ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे, मतमोजणी २० डिसेंबर रोजी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे, तर निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत.